सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर-निगुडघर मार्गावरील नांदगाव ता.भोर येथील उतारावरून महाड बाजूकडे जाणाऱ्या ट्रेलर (सिजी o७ सीए ६५३४ )याने भोरकडे येणाऱ्या दुचाकी स्वराला विरुद्ध बाजूने जोरदार ठोकर दिल्याने आंबवडे खोऱ्यातील ओहळी ता.वाई येथील दुचाकीस्वर तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार दि.१ रोजी घडली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनर नांदगाव येथील उतारावरून महाड बाजूकडे भरधाववेगाने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वाराला जोरदार ठोकर दिली.या घटनेत दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झाला.तर कंटेनर २०० फूट खोल दरीत कोसळला.भोर पोलीस निरीक्षक अण्णा पवार तसेच कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून पुढील कार्यवाही सुरू आहे.