सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : महेश जगताप
जमिनीच्या मालकी हक्कावरून शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बाळासाहेब विश्वनाथ भांडवलकर रा. करंजे, देऊळवाडी ता. बारामती जि पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वडगाव निंबाळकर पोलिसांनी राजेद्र अरूण भांडवलकर, विवेक विलास भांडवलकर, दोन्ही रा करंजे देऊळवाडी ता. बारामती जि पुणे, चेतन नंदकुमार आगलावे रा. थेऊर ता. हवेली जि पुणे, राहुल पवार रा. चौधरवाडी ता. बारामती जि पुणे, लाल रंगाचा मंहीन्द्रा अर्जुन टॅक्टर चालक नाव माहीत नाही व रोहीत पवार रा. चौधरवाडी ता. बारामती जि पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २८ फेब्रुवारी रोजी करंजे, देऊळवाडी ता. बारामती जि पुणे गट नं. नं.२२९ मध्ये वरील आरोपी दोन टॅक्टर व १ जे.सी.बी. मशिन घेऊन क्षेत्रामध्ये आले व तेथील झाडाझुडपाची साफसफाई करू लागले त्यावेळी बाळासाहेब भांडवलकर तसेच त्यांची पत्नी छाया, मुलगा पंकज असे त्यांना हे क्षेत्र आमचे आहे या क्षेत्राचे बाबत दिवाणी न्यायालयात दावा दाखल आहे. त्याचा अजुन निकाल लागलेला नाही, तुम्ही याक्षेत्रामध्ये काहीही करू नका असे म्हणाले असता राजेंद्र भांडवलकर, विवेक भांडवलकर व चवतं १ ते ३ यांनी बाळासाहेब भांडवलकर यांना शिवीगाळ दमदाटी करून धक्काबुक्की करून हाताने मारहान केली तसेच जे.सी.बी.चालक राहुल पवार याने फिर्यादीचा मुलगा पंकज यास दमदाटी करून ढकलुन दिले व सदर ठिकाणी आलेले एक लाल रंगाचा मंहीन्द्रा अर्जुन टॅक्टर चालक नाव माहीत नाही त्याने फिर्यादीस शिवीगाळ दमदाटी केली तसेच दुसरा न्यु हॉलंड टॅक्टर निळ्या रंगाचा त्यावरील चालक आरोपी क्र राहुल पवार यानेही फिर्यादी तसेच फिर्यादीची पत्नी व मुलगा याना शिवीगाळ दमदाटी केली व दोन्ही टॅक्टर चालक रोहित पवार यांने आम्ही आमचे सदर क्षेत्राचा वाद दिवाणी कोर्टात दाखल आहे तुम्ही या क्षेत्रामध्ये काहीही करू नका असे म्हणालो असता ही आरोपी ट्रँक्रटर चालक यानी फिर्यादीचे क्षेत्रामध्ये टॅक्टरने नांगरणी केलेली आहे.
तसेच राजेंद्र भांडवलकर व विवेक भांडवलकर यानी फिर्यादीने त्याचे क्षेत्रामध्ये पोलवर बसवलेले सी.सी. टी.व्ही कॅमेरे तोडुन नुकसान केलेले आहे. पुढील तपास पो हवा अमोल भोसले हे करीत आहेत .