सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामतीच्या पश्चिम भागातील वाघळवाडी सध्या विविध शिक्षण संस्थेमुळे शैक्षणिक हब झाले असून, या मध्ये आता प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १०० बेडच्या हॉस्पिटलमुळे, आरोग्य सेवा देणाऱ्या वास्तूची आणखी भर पडणार असल्याने वाघळवाडी ‘विकासाचे रोल मॉडेल’ठरेल असे मत सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप वाघळवाडी येथील कार्यक्रमात व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की, प्राथमिक आरोग्य केंद्र,पाणी पुरवठा योजना ,वनउद्यान निर्मितीसाठी वनविभागाच्या ७० एकर जागेत शेततळे,ठिबक याचे काम कारखान्याने हाती घेतले आहे .तसेच कारखाना कॉलनी परिसरात जुनी अंगणवाडी झाल्याने नवीन अंगणवाडीची इमारत बांधणार आहोत.सार्वजनिक हिताची कामे असल्यानेच आरोग्य केंद्र व पाणी योजनेसाठी कारखान्याने जागा दिली असून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळे ही कामे शक्य होत आहेत.सर्वत्र कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या निर्माण होत असून परिसरातील गावांच्या करिता कचरा प्रकल्पाची गरज आहे.
वाघळवाडी ग्रामपंचायतीस सोमेश्वर कारखान्याने प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ५० गुंठे तर पाणी पुरवठा योजनेसाठी ३ एकर २० गुंठे जागा दिल्याबद्दल त्याच्या ७/१२ पत्रकाच्या हस्तांतरणाचा कार्यक्रम सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे होते. तर प्रमुख उपस्थीती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष राजवर्धन शिंदे,संचालक लक्ष्मण गोफणे,शैलेश रासकर,ऋषिकेश गायकवाड,मिलिंद कांबळे,उपसभापती बाळासाहेब शिंदे,राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष सतिश सकुंडे,विजय सावंत,नंदा सकुंडे,ग्रामपंचायत अधिकारी संजयकुमार भोसले, सुचेता साळवे, रेश्मा मगर,सोनाली भगत उपस्थित होते.
पुणे जिल्हा परिषदेत कार्यरत असताना अजितदादांच्या माध्यमातुन वाघळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर केले. तसेच आता १०० बेडचे हॉस्पिटल मंजुर झाले असून यातून अधिकच्या आरोग्य सुविधा मिळतील ज्याचा परिसराला चांगला फायदा होईल, असे मत प्रमोद काकडे यांनी व्यक्त केले.
विविध विकास कामे वाघळवाडी मध्ये प्रगती पथावर आहेत. त्या मुळे गावचा चेहरा मोहरा बदलला आहे. अनेक विकासकामांसाठी मंजुरी अजितदादांनी दिली आहे.असे मत कार्यक्रमा प्रसंगी बोलताना राजवर्धन शिंदे यांनी व्यक्त केले.
सरपंच अँड.हेमंत गायकवाड यांनी ग्रामपंचायती मध्ये करण्यात आलेल्या विविध विकासकामांचा आलेख कार्यक्रमा प्रसंगी मांडला.
या कार्यक्रमा प्रसंगी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ५ टक्के निधीचे ४५ दिव्यांग लाभार्थीना निर्वाह भत्त्याचे वाटप करण्यात आले.तसेच सर्व गावातील १५०० कुटुंबांना ओला आणि सुका कचरा विलगीकरणासाठी डस्टबिन वाटपाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच उमेद अभियान अंतर्गत १२ महिला बचत गटांना ७ लाख २० हजार रू अनुदानाचे वाटप उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
पाण्याच्या टाकीसाठी धोंडीराम आगवणे यांनी १ गुंठा जागा तर वडजाई सभागृहासाठी रामराव सकुंडे यांनी २ गुंठे तसेच आसराई सभागृहासाठी नथुराम शिंदे यांनी १ गुंठे जागा बक्षीसपत्र दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाचे संयोजन ग्रामपंचायतीचे उपसरपंच तुषार सकुंडे,सदस्य गणेश जाधव,जितेंद्र सकुंडे,अनिल शिंदे,प्रभाकर कांबळे,विशाल हंगिरे,सदस्या धनश्री जाधव,सुषमा सावंत,सोनाली दडस,अनिता दडस,निशा सावंत,आशा चव्हाण,निर्मला केंगार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अँड.हेमंत गायकवाड यांनी केले.सूत्रसंचालन अविनाश सावंत यांनी केले. तर उपस्थितांचे आभार उपसरपंच तुषार सकुंडे मानले.