'स्टेशन ऑफ दि मंथ' चा पहिला पुरस्कार वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनला

Admin
'स्टेशन ऑफ दि मंथ' चा पहिला पुरस्कार वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनला  

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला स्टेशन ऑफ दि मंथ चा उत्कृष्ट पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. 
          पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय  अभिनव देशमुख  यांनी पोलिसांच्या कामकाज मध्ये जास्तीत जास्त सुधारणा घडवून लोकाभिमुख सेवा देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या बक्षीस योजनेतील एक महत्वाची संकल्पना असलेले पोलीस स्टेशन ऑफ द मंथ म्हणून जिल्ह्यातील  सर्व पोलीस स्टेशन मधून संपूर्ण महिन्यामध्ये विविध कामकाजात सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या पोलिस स्टेशनची निवड करून त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाते या योजनांतर्गत माहे डिसेंबर २०२० मध्ये वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन सोमनाथ लांडे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ) यांनी व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मधील इतर पोलीस अधिकारी, व पोलीस अंमलदार यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक,  इतर कमीत कमी कालावधीत जास्त गुन्हे तपास, गुन्हे निर्गती, चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करणे, बेशिस्त वाहन चालकांविरुद्ध कारवाई, विविध गुन्हयातील तपासात जप्त किंमती मुद्देमाल फिर्यादीस परत देणे, वेळेत पासपोर्ट व चारित्र्य पडताळणी प्रकरणांची निर्गती, गुन्हेगारीस आळा या सारख्या प्रकारात चांगली कारवाई कारवाई केलेने माहे डिसेंबर २०२० महिन्याचा सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे पुरस्कार साठी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन ची निवड झालेली आहे.
           सदरचा पुरस्कार आज मनोज लोहिया (पोलीस महानिरीक्षक,कोल्हापूर परिक्षेत्र) यांचे हस्ते व .डॉ.अभिनव देशमुख . (पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण).मिलिंद मोहिते  (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण) यांचे उपस्थितीत वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी . सोमनाथ लांडे यांचे वतीने पोलीस उपनिरीक्षक.योगेश शेलार यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे स्वीकारला आहे.
       
To Top