सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वर करखाना कार्यस्थळावरील जिल्हा परिषदे शाळे पाठीमागील झोपड्या अचानक आग लागल्याने जळून खाक झाल्या.
या झोपडयांबरोबरच झोपड्यातील धान्य, कपडे, भांडी जळून खाक झाली. तसेच झोपडयांशेजारील जनावरांचा गोठा देखील जळून खाक झाला. सोमेश्वर कारखान्याच्या अग्निशमन बंबामुळे ही आग आटोक्यात येऊन शेजारील झोपड्या आगीपासून वाचल्या.