सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यातील विषय क्रमांक दोन सन 2019-20 वर्षाचा तेरीज ताळेबंद, नफा तोटा पत्रकास मंजुरी देणे या विषयामध्ये दिलीप फरांदे, विक्रम भोसले, दिलीप खलाटे, धर्यशील काकडे, मदन काकडे या सभासदांनी सहभाग घेतला. यामध्ये विक्रम भोसले यांनी ठिबक सिंचन साठी जिल्हा बँकेकडून कर्ज मिळावे, तसेच कारखाण्यामार्फत उसाची रोपे मिळावीत अशी मागणी केली यावर अध्यक्ष जगताप यांनी याबाबत लवकर विचार करण्यात येईल असे सांगितले तर मदन काकडे यांनी अहवालात साखर मूल्यांकन कमी दिसत असल्याने त्याचा परिणाम ऊस दरावर दिसत आहे. तसेच मशनरी देखभाल व दुरुस्ती खर्चात तब्बल ९ कोटी २८ लाख खर्च दिसत आहे. तसेच अहवाल पान नंबर २५ वर कारखान्यावर एकूण १८८ कोटी कर्ज दिसत आहे. त्याच बरोबर 2019-20 चा साखर उतारा पडण्याचं काय कारण असे प्रश्न उपस्थित केले यावर अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी खुलासा करताना सांगितले की, मागील विस्तारवाढी नंतर कारखाना ५ हजार ४०० असा चालत होता तो आता ६ हजार, सहा हजार १०० असा चालत आहे. अंतर्गत सुधारणा मुळे गाळप वाढले आहे. कर्जबाबत बोलताना अध्यक्ष म्हणाले, मागील दीर्घ मुदतीचे हे कर्ज दिसत असून कर्जाचे हप्ते रेग्युलर सुरू आहेत. कोणतीही थकबाकी नाही तसेच साखर उताऱ्याबाबत बोलताना जगताप म्हणाले, की सोमेश्वर कारखाना हा ८० ते ८५ टक्के २६५ या उसाचे गाळप करत असून साखर उतारा हा जिल्ह्यात एक नंबरचा असतो असे स्पस्ट केले