संतापजनक.....केतकावळेच्या भैरवनाथ मंदिरात मुखवट्याची चोरी: एक लाखांचा माल लंपास.

Admin
संतापजनक.....केतकावळेच्या भैरवनाथ मंदिरात मुखवट्याची चोरी: एक लाखांचा माल लंपास.

पुरंदर : प्रतिनिधी 

पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या केतकावळे येथील काळभेरवनाथ मंदिरातील भेरवनाथ देवाचे दोन व जोगेश्वरी देवीचे दोन चांदीचे मुखवटे चोरीस गेले आहेत. अंदाजे अडीच किलो वजनाचे तसेच १ लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली असून सुरज बाठे रा. केतकावळे यांनी चोरीची तक्रार सासवड पोलीसांत दाखल केली आहे.
सासवड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी  - सुरज कृष्णा बाठे (वय ३१ वर्षे) धंदा शेती रा.केतकावळे तालुका पुरंदर यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पुरंदर तालुक्यातील मौजे केतकावळे गावचे हद्दीतील
काळभेरवनाथ मंदिरात शुक्रवार दि. १२ मार्च रोजी दुपारी १:३० ते रात्री ९ च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी काळभैरवनाथ मंदिराच्या गाभाऱ्याचे लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून गाभाऱ्यात प्रवेश करून, गाभाऱ्यातील काळभेरवनाथ देवाचे दोन व जोगेश्वरी देवीचे दोन चांदीचे मुखवटे किंमत अंदाजे एक लाख रुपये अशा मजकूर वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
  सासवड पोलीस स्टेशनमध्ये गु. र. नं -107/2021 भादवि कलम 454, 457, 380.प्रमाणे अज्ञात चोरट्यांन विरोधात आज शनिवार दि. १३ रोजी गुन्हा दाखल झाला असून भोर पुरंदर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून सासवडचे पोलीस निरीक्षक ए. बी. घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली, स. पो. नि. आर.जे  माने तपास करत आहेत.
To Top