शेतकऱ्यांच्या ऊसाची विल्हेवाट लावून नुकसान टाळा, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल : दिलीप खैरे
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेतील ऊस मोठ्या प्रमाणावर शिल्लक असून ऊसतोडणी कामगारांकडून शेतक-यांना पैसे मागण्याचे प्रकार सुरू आहेत, भीती पोटी शेतकरी याबाबत तक्रार करण्यास पुढे येत नाहीत परंतु हे वास्तव असून कारखान्याने याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करून सभासदांचा ऊस वेळेत घेऊन जावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांनी दिला आहे.
याबाबत दिलीप खैरे यांनी कारखान्याला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस बाहेरील कारखाने येऊन गाळपासाठी नेत आहेत. अशा
तातडीने लक्ष घालून आपल्या कारखान्याचे वतीने हा ऊस पुरवठा व्हावा जेणे करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कारखान्याने आपल्या स्थरावर तातडीने अंमलबजावणी करावी अन्यथा सात दिवसानंतर सर्व ऊस उत्पादक सभासद शेतक-यांना सोबत घेऊन कारखाना व्यवस्थापनाच्या विरुद्ध कोरोनाचे सर्व नियम पळून तीव्र आंदोलन करण्यात येईल. त्याची सर्वस्वी जबाबदारी कारखाना।व्यवस्थापन मंडळाची राहील.