बारामती तालुक्यातील ही चार गावे कोरोनाची हॉटस्पॉट : गेल्या दहा दिवसात या गावात तब्बल ८६ रुग्ण

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------

बारामती तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोनाचे पुन्हा जोर पकडला असून तालुक्यात शहर आणि ग्रामीण भाग मिळून रोज ६० ते ७० नागरिकांना कोरोनाची लागण होत आहे. 
            तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोनाचे पेशेंट कमी असून काटेवाडी, माळेगाव, पणदरे आणि गुणवडी ही चार गावे कोरोनाचा हॉटस्पॉट होताना दिसत आहेत. मागील दहा दिवसात या चार गावात तब्बल  ८६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिलेल्या माहितीनुसार माळेगाव येथे ३४, पणदरे येथे २८, काटेवाडी येथे १२ तर गुणवडी येथे १२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तालुक्यातील इतर गावांच्या तुलनेत या गावातील कोरोना बधितांची संख्या अधिक आहे.
To Top