सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर विद्यालय व मु.सा. काकडे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध कवी, लेखक प्रा. प्रदीप पाटील यांच्या "अंतरीचा भेद "या कवितासंग्रहाची देशातील मानांकित आणि ऐतिहासिक अशा महाराजा सयाजीराव विद्यापीठ बडोदा च्या बी.ए. पदवी अभ्यासक्रमामध्ये पाठ्यपुस्तक म्हणून निवड झाली आहे.
तसेच एम.ए या अभ्यासक्रमातही या कवितासंग्रहाचा अंतर्भाव केला आहे. या यशाबद्दल त्यांचा सत्कार सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्या शुभहस्ते करण्यात आला.या प्रसंगी संचालक किशोर भोसले, युवा नेते गौतम काकडे, कुणाल गायकवाड, सोमेश्वर विद्यालयाचे प्राचार्य एस. पी. जगताप, संभाजी काकडे, लोकमत चे पत्रकार महेश जगताप, तुषार धुमाळ, प्रा. हनुमंत माने,आनंदराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुरुषोत्तम जगताप यांनी आपल्या हातून अशीच लेखन कार्य घडोत. अशा शुभेच्छा प्रा. प्रदीप पाटील यांना दिल्या. प्रा. प्रदीप पाटील १९९० नंतरच्या मराठीतले महत्त्वाचे कवी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या जन्मभूमीत त्यांचा सत्कार होणे हे अभिमानास्पद आणि औचित्याचे असल्याचे पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केले. या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक प्रा. हनुमंत माने यांनी केले.