सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे येथील राहुल खोमणे यांच्या खोमणे गुळाचा चहा या यशानंतर आता खोमणे बंधूनी खोमणे 'कटलाईन' या व्यवसायात प्रदार्पण केले आहे.
सोमेश्वरनगर ता बारामती येथे आज खोमणे बंधूंच्या खोमणे कटलाईन या नवीन व्यवसायाचा शुभारंभ वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सोमेश्वर कारखान्याचे संचालक लक्ष्मण गोफने, लेबर ऑफीसर दीपक निंबाळकर, जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे, adv गणेश आळंदीकर, महेश जगताप, विनोद गोलांडे, राहुल खोमणे, विश्वजित माळशिकारे,विराज खोमणे व श्रीकांत चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षापूर्वी राहुल खोमणे या युवकाने खोमणे गुळाचा चहा सुरू केला. या चहाच्या राज्यात २५० च्या वर शाखा झाल्या आहेत. आज खोमणे बंधूनी कटलाईन या व्यवसायात प्रदार्पण केले आहे. चहाच्या सारख्याच्या या व्यवसायाच्या देखिल राज्यभर शाखा होतील असे मत सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी व्यक्त केले.
COMMENTS