शाब्बास रे पठ्ठ्या.... वाणेवाडीचा युवक ऑनलाइन मॅच खेळला आणि झाला लखोपती : मिळवली तब्बल एवढी रक्कम

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-----------

बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील अक्षय नंदकुमार भोसले याने ऑनलाइन क्रिकेट मॅच खेळून तब्बल पाच लाख रुपये मिळविले आहेत. 
             अक्षय हा गेली पाच महिने ऑनलाइन क्रिकेट मॅच खेळत होता. अखेर त्याच्या प्रयत्नांना यश आले. आणि काल त्याच्या युनियन बँकेच्या खात्यावर  दीड लाख टॅक्स वजा जाता साडेतीन लाख रुपये जमा झाले आणि अक्षयचा आनंद गगनात मावेनासा झाला. अक्षयची घरची परिस्थिती हालाखीची असून वडील शेती करतात. अक्षय ने बीएस्सीच शिक्षण पूर्ण केले असून पैशांअभावी त्याचे पुढील शिक्षण थांबले होते. या मिळालेल्या पैशातून पुढील शिक्षण पूर्ण करणार असल्याचे अक्षय भोसले याने सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना सांगितले.
To Top