मोरगांव : प्रतिनिधी
मोरगाव ता बारामती परीसरात आज दि २० रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हलक्या ते मध्यम पावसाचा शिडकावा पडला. तर तरडोली , आंबी बु , आंबी खुर्द येथे पावसाबरोबर गारांचा वर्षाव झाला .
सलग दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर आज मोरगांव परीसरातील मोरगाव , तरडोली , देऊळगाव रसाळ आंबी बु , आंबी खुर्द , जोगवडी , माळवाडी परीसरात हलक्या मध्यम पावसाचा वर्षाव झाला .यामुळे दिवसभर उष्णतेने हैराण असलेल्या लोकांनी मनमुराद पावसात भिजण्याचा आनंद घेतला . पंधरा ते वीस मिनिटे वाऱ्यासह पाऊस सुरु होता.
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनासह महीलांची चांगलीच तारांबळ उडाली . उन्हात वाळत टाकलेला गहु , ज्वारी तात्काळ गोळा करुन झाकावी लागली . तसेच तरडोली , आंबी बु , आंबी खुर्द येथे पवसाबरोबर गारांचा शिडकावा झाला . यामुळे उभ्या गव्हाच्या ओंब्या काही प्रमाणात झडल्या असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे .