सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार बारामतीसाठी तीन हजार कोवीशी्ल्ड कोरोना व्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाले असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
सदरचे कोरोना व्हॅक्सिनची लस ही पहिल्या आणि दुसरा डोससाठी वापरण्यात येणार आहे, उद्या आणि परवा सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध होणार आहे. काटेवाडी सह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडीत लसीचा तुटवडा अशा बातम्या झळकल्यानंतर याची जिल्हाधिकारी यांनी तातडीने दाखल घेत बारामती तालुक्यासाठी तीन हजार लशीची सोय केली आहे.