सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या तब्बल १५० वर पोहचली. काल एकूण ६११ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी ९६ जनांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते तर २११ जणांचे अहवाल प्रतीक्षेत होते. त्यापैकी तब्बल ५४ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
कालचे शासकीय दि २६ चे एकूण rt-pcr नमुने ६११. एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-५०. प्रतीक्षेत ९५. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -३२
काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -५९ त्यापैकी पॉझिटिव्ह -२५. कालचे एकूण एंटीजन ४७. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-२१.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ९६
शहर-६१ ग्रामीण- ३५.
कालचे प्रतिक्षेत असलेल्या २११ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील ४४ व ग्रामीण भागातील १० असे एकूण ५४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून इतर तालुक्यातील चार जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे बारामतीतील रुग्ण संख्या ८९६८ झालेली आहे.