जांभळीमध्ये निवडणुकीच्या वादातून ग्रामपंचायत कार्यालयाची तोडफोड
माणिक पवार
भोर : प्रतिनिधी
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या रागातून अज्ञातांनी ग्रामपंचायत कार्यालयाचा दरवाजा दगडाने तोडफोड करून समोर उभी असलेली एका खासगी वाहनाच्या काचा फोडून नुकसान करण्यात आल्याचे बोलले जात असून याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे.
भोर तालुक्यातील जांभळी गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारासही घटना घडली असून नुकसान केल्याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात उपसरपंच शिवाजी कोळपे यांनी फिर्याद दिली आहे. जांभळी ग्रामपंचायत कार्यालयाचे अज्ञात तीन ते चार जणांनी दगडाच्या साह्याने तोडफोड करून ग्रामपंचायत समोर उभी असलेली खासगी टेम्पो क्र. एम.एच १६ ए इ ५२३३ याच्यावर दगडफेक करून काचा फोडून नुकसान केले आहे. घटनास्थळी पोलिस कर्मचारी महेश खरात व राहुल कोल्हे यांनी पाहणी केली. पुढील तपास हवालदार प्रमोद भोसले करत आहे.