खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीवर 'महिलाराज' : सरपंचपदी भाग्यश्री गडदरे तर उपसरपंचपदी श्रुती मदने

Admin
खंडोबाचीवाडी ग्रामपंचायतीवर 'महिलाराज' : सरपंचपदी भाग्यश्री गडदरे तर उपसरपंचपदी श्रुती मदने

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज----------

खंडोबाचीवाडी(ता.बारामती) येथील ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत  सोमेश्वर जनशक्ती पॅनेलच्या भाग्यश्री धनंजय गडदरे आणि उपसरपंचपदी श्रृती महेश मदने यांची बिनविरोध निवड झाली. 
        या पॅनेलचे पाच सदस्य निवडून आले होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे, सोमेश्वरचे संचालक लक्ष्मण गोफणे, माजी उपाध्यक्ष वसंतराव मदने, युवा कार्यकर्ते  धनंजय गडदरे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच आणि उपसरपंच निवडी पार पडल्या.
          यावेळी ग्रामपंचायत माजी सदस्य गणेश पवार,  भगवाननाना सोसायटीचे माजी चेअरमन रामभाऊ लोखंडे,  हनुमंतराव लकडे, माजी सरपंच दत्तात्रय मदने ,दादासो मदने, दादासो लकडे, सदस्य संतोष धायगुडे, अजित विलास लकडे, मंगल दिनकर ठोंबरे, पियुष फंरादे, माजी सरपंच सतीश वळकुंदे, सुनील मदने संचालक आधार पतसंस्था, प्रविण कोरडे संचालक निरा कॅनॉल युनियन संघ बारामती, वैभव सावंत, सागर मदने आदी मान्यवर उपस्थित होते.  निवडणूक निर्णय अधिकारी मिसाळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यांना तलाठी मधुकर खोमणे,  ग्रामसेवक रेवणनाथ होळकर यांनी सहकार्य केले.   
            
To Top