निरेचा पाणीपुरवठा सुरळीत : थकीत रकमेपैकी पंचायतीकडून काही रक्कम अदा

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

पुरंदर तालुक्यातील निरा ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेचे १ कोटी ९० लाख थकल्याने काल सायंकाळी पाणीपुरवठा योजनेचे वीज कनेक्शन तोडण्यात आले होते. ग्रामपंचायत ने आज लागलीच काही 
रक्कम भरून निरेचा पाणीपुरवठा सुरळीत केला. 
           निरा महावितरण चे पाटील यांच्याकडे आज धनादेश अदा केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विराज काकडे, उपसरपंच राजेश काकडे, माजी सदस्य विजय शिंदे, सदस्य राधा माने, अभिजित भालेराव, माधुरी वाडेकर, संदीप धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते. 
        ग्रामपंचायत नीरा शिवतक्रार येथील सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की ग्रामपंचायत नीरा शिवतक्रार येथील मागील वीज पुरवठा थक बाकी व पाणी पुरवठा थक बाकीची रक्कम १ कोटी ९० असल्यामुळे पाणी पुरवठा बंद केला होता. आज सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी चर्चा करून काही रक्कम भरली आहे  व  पाणी पुरवठा व वीज पुरवठा सुरुळीत सुरू केला आहे.

तेजश्री काकडे सरपंच ग्रामपंचायत निरा- शिवतक्रार
निरा ग्रामपंचायतची घरपट्टी व पाणीपट्टीच्या स्वरूपात दोन कोटीच्या आसपास येणे बाकी आहे. सद्या  काही रक्कम भरून पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. ३१ मार्च च्या आत महावितरण ला अजून काही रक्कम भरण्याचा शब्द दिला आहे. येथून पुढे पाणीपुरवठयाचे महिन्याच्या महिन्याला वीजेचे बिल अदा करण्यात येणार आहे.
To Top