कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीला सोमेश्वर मंदिर बंद : पोलिस बंदोबस्तामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट

Admin
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाशिवरात्रीला सोमेश्वर मंदिर बंद : पोलिस बंदोबस्तामुळे मंदिर परिसरात शुकशुकाट

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज---------

राज्यातील शिवभक्तांसाठी प्रसिध्द असलेले करंजे (ता.बारामती) येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदीर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आले होते. यामुळे मंदीर परीसरात शुकशुकाट पहायला मिळाला. गतवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव पार पडल्यानंतर येथे भरणारी श्रावण महिन्यातील यात्राही रद्द करण्यात आली होती. तहसीलदार विजय पाटील यांच्या सुचनेने मंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष प्रताप भांडवलकर आणि सचिव राहुल भांडवलकर यांनी दिली. मंदीर परीसरात असलेली दुकानेही बंद ठेवण्यात आल्याने व्यवसायिकांचे नुकसान झाले.
            महाशिवरात्रीच्या मध्यरात्री राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर आणि सोमेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष शैलेश रासकर यांच्या हस्ते स्वयंभू शिवलिंगाची महापुजा करण्यात आली. यावेळी सर्व विश्वस्त उपस्थित होते. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दरवर्षी अतिरुद्र अनुष्ठान यज्ञाचे आयोजन करण्यात येते याची सांगता शुक्रवार(दि.१२) रोजी होणार आहे. महाशिवरात्री निमित्त देवस्थानच्या वतीने मंदीराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. याशिवाय देवस्थान भाविकांसाठी विविध उपाययोजना करत आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे आणि कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
लांबूनच दर्शन----------
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आज जिल्ह्यातील मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश होते. त्यामुळे सर्वच मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. महाशिवरात्री हा वर्षातुन एकदाच येत असल्याने भाविकांना दर्शनाला मुकावे लागले आहे. अनेक भाविकांनी मंदिरात जाता येत नसल्याने लांबूनच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले. 
To Top