आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगारांना ब्लॅंकेटचे वाटप
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावरील ऊसतोडणी कामगारांना ५०० ब्लँकेट चे वाटप करण्यात आले.
विधानपरिषद आमदार सुरेश धस यांच्या ५१ व्या वाढदिवसाच्या निमित्त ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथील माजी सरपंच भाऊसाहेब भवर तसेच आष्टी मतदार संघातील कार्यकर्त्यांच्या वतीने धस यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा, हॉलीबॉल स्पर्धा, गोरगरिबांना धान्य वाटप तसेच शालेय साहित्य वाटप, कुस्त्यांचा फड तसेच लावणी मोहोत्सव असे उपक्रम दरवर्षी राबविले जातात. यावर्षी सोमेश्वर कारखान्यावरील ५०० ऊसतोडणी कामगारांना ब्लेंकेट चे वाटप करण्यात आले. यावेळी सेवा सोसायटीचे अध्यक्ष देविदास खोटे, अमळनेरचे सरपंच उद्धव पवार, अरुण गाडे, मुकादम अशोक काळे, शहादेव जगताप, देवराव जगताप, बाबासाहेब सपाटे, नाथराम पिसाळ, रामदास सुळ आणि सपकळ यांच्यासह ऊसतोडणी कामगार उपस्थित होते.