भोर तालुक्यातील रस्त्यासाठी पुणे जिल्हा परिषदेकडून ४८० लक्ष निधी मंजूर : रणजीत शिवतरे
माणिक पवार
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्यातील दळणवळण सुलभ होण्यासाठी रस्ते उत्तम दर्जाचे करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून भोर तालुक्यातील रस्त्यासाठी ४८०.००लक्ष एवढा भरीव निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा अर्थ व शिक्षण सभापती रणजीत शिवतरे यांनी दिली.
यामध्ये इजिमा १०१ जाधव आवाड (म्हसर बु) रस्ता (ग्रामा २५९)- १५ लक्ष,उंबरे ते बु(बांधार्याकडे) जाणारा रस्ता (ग्रामा २१६)- २०लक्ष, दिडघर ते हातवे बु रस्ता (ग्रामा ८३ )-२० लक्ष, पावर हाऊस ते थोपटेवाडी पवारवाडी रस्ता (ग्रामा १६५)- ३० लक्ष, पिसावरे स्मशान भूमी रस्ता करणे (ग्राम २९५) -१० लक्ष, पोंबर्डी जोड रस्ता (ग्रामा २०) १५ लक्ष, प्रजिमा ४५ चिखलावडेवाडी चिखलावडे ते माळवाडी नाटंबी (मार्ग ग्रामा १०)- ५ लक्ष, प्र. रा. मा.१५ ते धामणदेव रस्ता (ग्रामा २२६)- १५ लक्ष, प्र. रा. मा.१५ ते वडगाव ते कातकरीवस्ती रस्ता करणे (ग्रामा २११) -१५ लक्ष, प्र. रा. मा. १५ नांदगांव ते करंजे रस्ता (ग्राम १४) - ५ लक्ष, महुडे बु पिलाणेवाडी रस्ता (ग्रामा १६८) - २५ लक्ष, महूडे बु मोरेवाडी रस्ता (ग्रामा १६८) -१५ लक्ष, शिंद चव्हाणवाडी रस्ता (ग्रामा ४५)-१० लक्ष, रा. मा. ४ ते केळवडे साळवडे रस्ता (ग्रामा २ ) -२५ लक्ष, रा. मा.४ ते वरवे खु जोडरस्ता (ग्रामा ४६) -२५ लक्ष, शिंद ते चव्हाणवाडी (ग्रामा ३०५)- १० लक्ष असा २६०.०० लक्ष निधी ३०५४ मधून मंजूर करण्यात आला आहे.
तसेच ५०५४ मधून देवगाव ते कांबरे. जोड रस्ता (इजिमा १०६) -३० लक्ष, प्रजिमा १४४ ते आंबवडे जेधेवाडी ते कारी ते सांगवी भिडे पर्यंतचा रस्ता (इजीमा १०७) (प्रजिमा१४५ कंक वाडी पाटी ते कारी) - २५ लक्ष, प्रजिमा ४५ ते नाझरे राऊत वाडी, धावाडी नेरे वरवडी ते तुपेवस्ती पर्यंतचा रस्ता (इजिमा १०३) -२० लक्ष, प्ररामा १५ ते पिसावरे महुडे बु ते धनगरवाडी पर्यंतचा रास्ता सुधारणा (किमी. ५ ते ७) - २५ लक्ष, प्ररमा १५ ते पिसावरे महुडे बु ते धनगरवाडी पर्यंत रस्ता सुधारणा (किमी २.५ ते ५) -. ३५ लक्ष, खोपी जोडरस्ता करणे (इजिमा १०८) - ३५ लक्ष, रामा ते १०६ बनेश्वर केळावडे वर्वे बु शिवरे बोरमाळ ते रामा ०४ ला जोडणारा रस्ता -५०लक्ष असा २२०.०० लक्ष निधी मिळून एकूण ४८०.०० लक्ष मंजूर करण्यात आला आहे.