सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील निंबुत ग्रामपंचायतच्या वतीने निंबुत ग्रामस्थ, पोलीस, पत्रकार आणि महावितरणचे कर्मचाऱ्यांना १ हजार ५०० सॅनिटायझर बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात आला. निंबुत मधील निंबुत गावठाण, निंबुत छपारी, फरांदेनगर, जगताप वस्ती, लकडेवस्ती या ठिकाणी १३०० बाटल्यांचे वाटप करण्याचे काम सुरू आहे. तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, करंजेपुल औटपोस्ट, सोमेश्वर पत्रकार ग्रुप व सोमेश्वर महावितरण च्या कर्मचाऱ्यांना २०० बाटल्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतचे मार्गदर्शक गौतम काकडे, उदय काकडे, सरपंच निर्मला काळे, सदस्य कुसुम काकडे, विद्यादेवी काकडे, नंदकुमार काकडे आदी मान्यवर उपस्थित होते.