सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती शहर आणि ग्रामीण भागातील मिळून आजअखेर ६२ हजार ३०५ जणांना कोविडची लस दिली असून रोज सरासरी ४ हजार च्या आसपास लसीकरण होत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी सांगितले आहे.
तालुक्यातील ३६ ठिकाणी हे लसीकरण सुरू असून यामध्ये ३२ आरोग्य केंद्रात तर ४ खाजगी ठिकाणी ही लस दिली जाते. रोजचा सरासरी लसीकरणाचा आकडा ४ हजारांच्या आसपास आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे अशी माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
कालचे शासकीय दि १३ चे एकूण rt-pcr नमुने ५२८ एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-१७२ प्रतीक्षेत -००. इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१८. काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr -१८० त्यापैकी पॉझिटिव्ह -८४ कालचे एकूण एंटीजन २३४. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-७४.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ३३०
शहर-१७७ ग्रामीण- १५३.
एकूण रूग्णसंख्या-१२३७५
एकूण बरे झालेले रुग्ण- ९८३५
मृत्यू-- १९०.