जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे- सपोनि सोमनाथ लांडे : सोमेश्वरनगर येथे रक्तदान शिबीराचे उदघाटन

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वरनगर परिसरातील विविध संघटनांच्या वतीने महा रक्तदान शिबीराचे आयोजन केले असून सर्वांनी यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे यांनी  केले. 
            बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे महा रक्तदान शिबीराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी युवा नेते गौतम काकडे, सराफ असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण आळंदीकर, बारामती तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, डॉ सौरभ काकडे, नवनाथ भोसले, पत्रकार महेश जगताप, गणेश आळंदीकर, युवराज खोमणे, अमोल भोसले, योगेश सोळस्कर सोमेश्वर चे संचालक महेश काकडे, अनिल शिंदे, धनंजय गडदरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
         सध्या कोरोना काळामध्ये बारामती तालुका पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात रक्ताची कमी भासत असल्यामुळे सोमेश्वरनगर परिसरातील विविध सामाजिक संघटना एकत्र येऊन भव्य रक्तदान शिबिर आयोजित करत आहोत. एक हात मदतीचा सोशल फाउंडेशन, आजी माजी सैनिक संघटना, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघ, सोमेश्वर कारखाना, मराठा सेवा संघ, आशा प्रकल्प, मेडिकल असोसिएशन, सोमेश्वर डॉक्टर असोसिएशन, वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे, साद संवाद स्वच्छता ग्रुप, सराफ असोसिएशन, ग्रामपंचायत निंबुत, ग्रामपंचायत वाघळवाडी, ग्रामपंचायत वाणेवाडी, ग्रामपंचायत मुरूम, ग्रामपंचायत करंजेपुल, प्राथमिक आरोग्य केंद्र होळ, बालाजी ग्रुप, बैलगाडा संघटना, सोमेश्वर ट्रेकर्स, सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब, विवेकानंद अभ्यासिका आदींच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले असून
यामध्ये रक्तदान शिबीर व प्लाझ्मा डोनेट तपासणी होणार आहे.  कोविड लस घेतल्यानंतर ५६ दिवसांनी आणि कोविड होऊन गेल्यानंतर ३० दिवसांनी रक्तदाते रक्तदान करू शकतात.
To Top