सोमेश्वरकरांनी करून दाखवलं..... महा रक्तदान शिबिरात तब्बल ३०३ बाटल्या रक्त संकलन

Admin
 सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील विविध संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या महा रक्तदान शिबीरात तब्बल ३०३ बाटल्या रक्त संकलन झाले. 
           शिबिराचे उदघाटन वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या हस्ते पार पडले. सकाळी ९ वाजता सुरू झालेले रक्तदान शिबीर सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटापर्यंत चालले. शिबिराला युवक आणि महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. मात्र कोविड १९ लस घेतल्यानंतर ५६ दिवस तसेच कोविड होऊन गेल्यानंतर ३० दिवस रक्तदान करता येत नसल्याने त्याचा फार मोठ्या प्रमाणावर रक्त संकलनावर परिणाम झाला. 
          दरम्यान दिवसभरात रक्तदान शिबीरास जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पंचायत समिती सभापती निता फरांदे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे, एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड, युवा नेते गौतम काकडे, 
सोमेश्वरचे संचालक सिध्दार्थ गीते, महेश काकडे, राष्ट्रवादी युवक चे माजी अध्यक्ष विक्रम भोसले, अभिजीत काकडे, सराफ असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष किरण आळंदीकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. सौरभ काकडे, उद्योजक आर. एन. शिंदे, सुनिल भोसले, दीपक साखरे, डॉ.मनोहर कदम, डॉ. सुधीर कदम, डॉ. विद्यानंद भिलारे, डॉ. राहुल शिंगटे, डॉ. अमोल जगताप,
 ॲड. नवनाथ भोसले, मराठा महा संघाचे तालुकाध्यक्ष अमोल भोसले, सामाजिक कार्यकर्ते योगेश सोळस्कर, ॲड. गणेश आळंदीकर, आजी- माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अनिल शिंदे, तालुका क्रिडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप यांच्यासह  बाळासाहेब शेंडकर, वैभव गायकवाड, संतोष शेंडकर, तुषार सकुंडे, हेमंत गायकवाड, आकाश सावळकर युवकांनी शिबिराला प्रतिसाद दिला.
To Top