सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील मु सा काकडे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक प्रकाश मारुती गायकवाड यांचे नुकतेच निधन झाले.
गेल्या पंधरा दिवसापासून ते कोरोना आजाराशी झगडत होते. सुरुवातीला सोमेश्वरनगर तर नंतर पुणे या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते. मु सा काकडे महाविद्यालयात ते क्रीडा शिक्षण म्हणून काम पाहत होते. त्यांनी बारामती, पुरंदर, खंडाळा आणि फलटण या तालुक्यात अनेक खेळाडू घडवले होते विद्यार्थ्यांच्या अचूक समस्या जाणून सहकार्य करणारा विद्यार्थी प्रिय प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळविलेले व्यक्तींमत्व म्हणजे प्रा गायकवाड होते. सेवानिवृत्तीनंतर ही कुस्तीसाठी गावोगाव फिरणारा हा क्रिडाप्रेमी अवलिया.. पदरमोड करुन विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यात धन्यता मानणारा माणूस हा माणूस कोणत्याही सामाजिक संस्थेने कोणत्याही स्पर्धा आयोजित केल्या की तेथे उत्साहाने प्रा पी.एम हजरच असणार. मोठ्या मनाने,न्यायाच्या भूमिकेने विजेत्या खेळाडूंना न्याय देणार,पंचांची भूमिका बजवावी पी.एम.सरांनी..पराभूत खेळाडूंच्या पाठीवरुन हात ही तितकाच प्रेमळपणे फिरवून त्याचा उत्साह द्विगुणित करणारा जादूमय हात हा आज आपल्यातून हरपला आहे.