शाब्बास रे पठ्ठ्या....वायरमन ने केली तब्बल सव्वा कोटी वीज बिलाची वसुली

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------

बारामती तालुक्यातील सोमेश्वर महावितरण अंतर्गत येणाऱ्या मुरूम या गावात वायरमन म्हणून कार्यरत असलेले मंगेश मारुती लकडे यांनी तब्बल १ कोटी १८ लाख रुपयांची वीजबिल वसुली केली आहे. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 
             विशेष म्हणजे लकडे यांनी ही वीजबिल वसूल अवघ्या ८३ दिवसात केली होती. शेतकऱ्यांचे वीजपंपाचे बिल गेले अनेक वर्षांपासून थकीत आहे. यासाठी महावितरण ने सन २०२० मध्ये कृषीधोरणा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली. या योजनेची प्रत्येक्ष अंमलबजावणी जानेवारी २१ मध्ये सुरू झाली. यासाठी सोमेश्वर महावितरण चे वरिष्ठ अभियंता सचिन म्हेत्रे यांनी सर्व स्टापशी संपर्क साधून ही योजना समजाऊन सांगितली. यानंतर वायरमन लोकांनी ही योजना शेतकऱ्यांना पटवून सांगितली. यातील फायदा शेतकऱ्यांना समजावून सांगितला. यामध्ये थकीत बिलावर ५० टक्के सूट तसेच चालू बिल पूर्ण भरायचे अशी ही योजना होती. मुरूम गावातील वायरमन मंगेश लकडे यांनी शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधत रोज १८ तास काम केले. गावातील ५४० शेतकऱ्यांनी प्रत्येक्ष संपर्क साधला. यापैकी तब्बल ३५० शेतकऱ्यांनी लकडे यांना प्रतिसाद देत वीजपंपाचे तब्बल १ कोटी ८ लाख तर घरगुती बिलाचे १० लाख रुपये भरले आहेत.
To Top