भोर तालुक्यातील शेतकऱ्यांचा रिंगरोडच्या मोजणीस विरोध

Admin
भोर : प्रतिनिधी
माणिक पवार 

महाराष्ट्र शासनाच्या रस्ते विकास महामंडळाच्या वतीने होत असलेल्या केळवडे ( ता.भोर )ते ऊर्से ( ता.मावळ ) या रिंगरोडला येथील शेतकऱ्यांचा पुर्ण विरोध असुन शेतकऱ्यांच्या या विरोधाला न जुमानता प्रशासनाकडुन जमीन संपादन व जमिन मोजणीचे कामकाज जबरदस्तीने होत असल्याने   रिंगरोडला आणि जमिन मोजणीस तीव्र विरोध शेतकऱ्यांनी केला जाणार असून शासनाने याची दखल न घेतल्यास  शेतकरी सामुहीक आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे.

प्रस्तावित रिंगरोडला शेतकऱ्यांनी वेळोवेळी हरकती नोंदवल्या असन सुद्धा त्याची दखल घेतली जात नाही. याबाबत केळवडे गावामधील शेतकऱ्यांनी  भुमिका मांडताना सांगितले कि, रिंगरोडसाठी भोर तालुक्यातील केळवडे, कांजळे, खोपी, रांजे, कुसगाव या गावामधील बागायती जमीन जात आहे. विशेष म्हणजे अत्ता पर्यंत एकाही शेतकऱ्याला अधिकृतरित्या याबाबत कळवण्यात आले नाही. वर्तमानपत्र व प्रसार माध्यम मधून बातम्या समजत असून भोर तालुक्यातुन जात असलेला रस्ता संपुर्ण बागायती क्षेत्र आहे. या जमिनी मधून अत्यंत चांगल्या प्रकारे शेती केली जाते,फळबाग लागवड आहे,पाँली हाऊस आहे, विहीरी, पोल्ट्रीशेड, आहेत शेतकरी हळु हळु सधन होत आहे काही शेतकरयांनी तर या शेतीवर शासनाचे आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त केले आहेत. अशी सर्व शेती एक क्षणात बंद करुन दुसरयाच्या हाती सोपवणे येथील शेतकरयाला कदापी शक्य नाही.जमिनी गेल्यातर येथील ९० टक्के शेतकरी भुमिहीन होणार आहेत तर ५० टक्के शेतकरी भुमिहीन व बेघर होऊन रस्त्यावर येणार आहेत.

शासन येथील शेतकरयांचा आवाज दाबुन टाकण्याचा प्रयत्न करत आहे पेपर मधुन माहीती मिळाल्यावर सर्व शेतकरयांनी या बाबत प्रांताधिकारी यांनी हरकती दिल्या आहेत. या हरकती बाबत गावपातळीवर सार्वजनीक चर्चा होऊन हरकतींचे निवारण करणार असल्याचे प्रांताधिकारी यांनी सांगितले होते, मात्र प्रत्यक्षात कोरोनाचे कारण दाखवत त्यांच्या कार्यालयात शेतकरयांना बोलावुन हरकतींची सखोल चर्चा करण्याच्या ऐवजी तुमचे म्हणणे आम्ही शासनाला कळवु असे सांगुन परत पाठवले जात आहे. भोर व वेल्हे तालुक्यात आत्ता पर्यंत धरणे, कालवे किंवा बंदपाईप लाईऩ, महामार्ग आदी अऩेक प्रकल्पासाठी भुसंपादन झाले आहे त्या बाधीत शेतकरयांचे अद्याप १०० टक्के पुर्नवसन झाले नाही असे अनुभव असताना या नविन प्रकल्पासाठी शेतकरी कशी काय जमिन देतील त्यामुळे या प्रकल्पाला आमचा पुर्ण विरोध आहे.

अन्यथा सामूहिक रक्तदान आंदोलन .
रिंगरोडला विरोधासाठी शासनाने अंदोलनास परवानगी दिली नाही तरी अनोख्या पध्दतीने आम्ही कृती समितीच्या वतीने यास विरोध करत या बाधीत गावामधील सर्व शेतकरी सामुहीक मोठ्या प्रमाणात रक्तदान करुन एक अनोखे आंदोलन करत शेतकरयांचे रक्त शोषणारया शासनाचा धिक्कार करणार असल्याचे ग्रामस्थांनी पवित्रा घेतला आहे.
To Top