फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील दत्त इंडिया साखर कारखाना उभारणार ६० बेडच कोविड सेंटर

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

फलटण तालुक्यातील साखरवाडी येथील दत्त इंडिया साखर कारखाना ६० बेडच कोविड सेंटर उभे करणार असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी अजित जगताप यांनी दिली. 
       विधान परिषदेचे मा. सभापती  रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने दत्त इंडिया साखर कारखाना रिक्रिएशन क्लब  साखरवाडी येथे लवकरच उभे राहणार आहे. ६० बेडचे कोरोना केअर सेंटर हे सर्व सोयी सुविधा युक्त कोरोना केअर सेंटर असणार आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणा या कामी पुरेशी ठरू शकत नाही. तसेच व कोरोना रुग्णांसाठी बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर इ. सोयी सुविधा देऊ शकत नाही. अशा या संकटाच्या काळामध्ये फलटण तालुक्यातील साखरवाडी मधील मोठे व्यावसायिक, व्यापारी व आर्थिकदृष्ट्या सदन व्यक्तींनी पुढे येऊन प्रशासनास मदत करणे खूपखूप गरजेचे आहे.
       या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार  श्री दत्त इंडिया शुगर फॅक्टरी साखरवाडी स्वतःच्या मालकीचे असलेले ठिकाणी ६० बेड उभे करून देण्याचा निर्णय घेतला असून या रुग्णालयाच्या उभारणीचे काम जलद गतीने सुरू केले आहे. यावेळी संजीवराजे निंबाळकर, जितेंद्र जयकुमार, कारखाना प्रशासकीय अधिकारी अजित जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top