परिंचे सरपंचाकडून बौद्ध विहारास गौतम बुध्द व डॉ आंबेडकरांची प्रतिमा भेट

Admin
परिंचे : प्रतिनिधी
राहुल वाघोले
भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त परिंचे ग्रामपंचायतीच्या सरपंच ऋतुजा जाधव यांनी येथील बौध्द विहारास गौतम बुध्द व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली.या वेळी सरपंच बौध्द वंदना कार्यक्रमात सहभागी झाल्या.व आंबेडकरांना अभिवादन केले.या वेळी बोलताना त्या म्हणाल्या थोर व्यक्ती यांच्या प्रतिमा पुजना बरोबरच त्यांच्या  विचारांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. परिंचे ग्रामपंचायत हद्दीत पुढील वर्षभरात  एकही व्यक्ती बेघर राहणार नाही सर्व  पात्र व्यक्तींना घरकुलांचा लाभ देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.या वेळी ग्रामपंचायत सदस्या पुष्पा नाईकनवरे ग्रामसेवक शशांक सावंत पोलीस पाटील अविनाश वाघोले हौसाबाई औव्हाळ कांचन पोळ ,सुनिता पोळ,भारती पोळ पार्वती पोळ कस्तुरी मगरे,आशा पोळ,सविता पोळ,येणूबाई पोळ,शालन गायकवाड,रंजना नाईकनवरे,पार्वती कुचेकर आदी महीला कोरोना नियमांचे पालन करित उपस्थीत होत्या..

To Top