सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी आज नव्याने आदेश काढला असून यामध्ये शुक्रवार सायंकाळी सहा ते सोमवारी सकाळी सहा पर्यंत संचारबंदी असणार असून अत्यावश्यक सेवेत फक्त दवाखाने आणि मेडिकल उघडे राहणार आहे.
विनाकारण कुणालाही घराच्या बाहेर पडण्यास मनाई असून असे दिसल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी उद्याच्या आणि परवाच्या बंद बाबत नव्याने आदेश काढत अत्यावश्यक सेवेतील दवाखाने आणि मेडिकल याव्यतिरिक्त फक्त दुधाच्या आस्थापना सकाळी सहा ते अकरा या वेळेत उघड्या राहणार आहेत. याव्यतिरिक्त इतर आस्थापना उघण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच संचारबंदी चा आदेश लागू असून विनाकारण बाहेर फिरणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.
वाचा सविस्तर काय आहे आदेश👇