बारामती तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदी रोहित कोकरे यांची निवड

Admin
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुका पंचायत समितीच्या उपसभापती पदी रोहित बळवंत कोकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 
          विद्यमान उपसभापती प्रदीप धापटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागी रोहित कोकरे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार कोकरे यांची निवड करण्यात आली. 
आज दि ९ रोजी बारामती पंचायत समितीच्या उप'सभापती पदासाठी झालेल्या सदस्यांच्या बैठकीमध्ये उपसभापतीपदी रोहित कोकरे  रा.पणदरे यांच्या निवडीची घोषणा बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री.संभाजीनाना होळकर यांनी केली.
To Top