सोमेश्वर रिपोर्टर न्यूज---------
कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कळविणेत येते की, आपले देशात विशेषतः
महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना विषाणूचे संक्रमणामध्ये वाढ होत असलेने त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीस अनुसरून इकडील परिपत्रक जा.क्रं./जीईएन/२३४/२०२१-२२
दि. २२/४/२०२१ अन्वये कळविलेप्रमाणे कारखान्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंब यासर्वांचे आरोग्य सुरक्षित रहावे यासाठी कारखान्याचे कामकाज दि. २३/०४/२०२१ ते दि. ०२/०५/२०२१ पर्यंत बंद ठेवणेत आले आहे.
तथापी सद्यस्थितीत आपले राज्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच असलेने महाराष्ट्र
शासनाने लॉकडाऊनचा कालावधी दि. १५/०५/२०२१ पर्यंत वाढविला आहे. ही बाब विचारात घेता
कारखान्याचे कामकाज दि. ०२/०५/२०२१ ऐवजी दि. १०/०५/२०२१ पर्यंत बंद ठेवणेत येत आहे. याबाबत कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक एच एन करवर यांनी याबाबत परिपत्रक प्रसिद्ध केले आहे.
मात्र अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आवश्यकतेप्रमाणे कामावर हजर राहतील तसेच तातडीचे कामासाठी खातेप्रमुखांचे सुचनेप्रमाणे इतर विभागातील कर्मचारी कामावर हजर राहतील. दि १०/०५/२०२१ पर्यंत जाहीर केलेल्या कारखाना कामकाज बंदच्या काळात सर्व संबंधितांनी घराबाहेर न पडता इतरत्र फिरू नये व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे सुचनांचे व नियमांचे पालन करावे. वरील कालावधीत अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांनी खातेप्रमुखांचे सुचनेनुसार शासनाच्या आवश्यक त्या नियमांचे पालन करून कामावर यावे व कामकाजाच्या सोईच्या दृष्टीने सर्व खातेप्रमुखांनी त्यांचे मोबाईल स्वीच-ऑफ करू नयेत. व तातडीच्या कामासाठी वरिष्ठांचे सुचनेप्रमाणे.त्वरीत हजर राहून कामकाज पाहणेचे आहे.