सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
मुटिॅ मोढवे येथील मोरे पाटील घराण्यातील जुन्या पिढीतील श्रीमती भागिरथीबाई यशवंतराव मोरे पाटील यांचं वृद्धापकाळाने निधन झाले..त्या ९४ वर्षांच्या होत्या. माजी आमदार अॅड विजयराव मोरे पाटील यांच्या त्या मावशी व चुलती होत्या.
शांत, संयमी,प्रेमळ स्वभावाने व आक्का या नावाने त्या परिसरात परिचित होत्या.त्यांना लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती.पुतणे माजी आमदार अॅड विजयराव मोरे पाटील यांच्या सामाजिक कार्यात आक्कांचे मोठं योगदान आहे.गोरगरीब, भटक्या जाती जमातीतील व अनाथ, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी या हेतूने अॅड विजयराव मोरे पाटील यांनी स्थापन केलेल्या संस्थेस आक्कांनी पाच एकर जमीन दान केली.आध्यात्माची आवड असणाऱ्या आक्का शेवटपर्यंत शाकाहारी राहुन त्यांनी आपले शरीर काटक ठेवले.आपला परिसर स्वच्छ व निसर्ग रम्य ठेवण्यावर त्यांचा भर असायचा.मुटिॅ मोढवे परिसर कायम दुष्काळी पट्ट्यात मोडतो.. असा भागात त्यांनी ७५ वर्षांपूर्वी मोरगाव-निरारोडवरील मोढवे गावात आपल्या शेतात नांद्रुकिचे झाडं लावले होते..या झाडाच्या सावलीचा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसहित अनेक लोक आनंद व आधार घेत आहेत.आश्रमशाळेच़्या परिसरात त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.गोरगरीब, भटक्या जाती जमातीतील व अनाथांच्याआई असणा-या आक्का यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..
आक्कांनी दान दिलेल्या जागेत यशवंतराव मोरे पाटील आश्रमशाळा सुरू आहे.या शाळेत अनेक गोरगरीब, भटक्या जाती जमातीतील व अनाथ मुले शिक्षणापासुन वंचित राहिली असती त्या मुलांची शिक्षणाची मोफत सोय झाली आहे. व ती सर्व मुले शिक्षण घेत आहेत.निवासी मुलांमुलीसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू आहेत.याचं ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान व व्यायामशाळा उभी करण्यात आली आहे.