काटेवाडीचे प्रगतशील बागायदार एकनाथराव काटे यांचे निधन

Admin
2 minute read
माई किसान मंचाचे प्रदेशाध्यक्ष व काटेवाडीतील प्रगतशील शेतकरी, प्रवचनकार एकनाथराव
मारुतराव काटे यांचे आज पुण्यातील दवाखान्यात
निधन झाले. हृदयावरील शस्त्रक्रियेच्या
उपचाराकरिता त्यांना पुण्यामध्ये दाखल करण्यात आली होते. ते ६८ वर्षांचे होते.
काटे यांना रविवारी हृदयविकाराचा तीव्र झटका
आल्याने पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये
उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर
त्यांची बायपास शस्त्रक्रिया झाली. या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
To Top