सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चीफ इंजिनियर सुखदेव नामदेव टेंगले यांचे आज निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते.
गेल्या पंधरा दिवसापासून टेंगले यांना त्रास जाणवू लागण्याने पुणे येथे ऍडमिट केले होते. त्यांना एका प्रदीर्घ त्रासाने ग्रासले होते. त्यातच त्यांचा कोरोना रिपार्ट पॉझिटिव्ह आला होता.
त्यांच्या पश्यात पत्नी, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. सोमेश्वर कारखान्यात ते गेल्या १३ वर्षांपासून चिप इंजिनियर म्हणून काम पाहिले होते.