आता विनाकारण रस्त्यावर फिरणारांची वाहने होणार जप्त : जिल्हाधिकारी यांचे आदेश

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
Adv. गणेश आळंदीकर

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळे  पुणे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यानी साथ रोग नियंत्रण कायदयानुसार नुकताच आदेश काढलेला असुन  आता दंडात्मक कारवाई म्हणून नेमलेल्या पथकाला ५०० रुपये दंड आकारण्याबरोबरच रस्त्यावर विनाकारण/ कामाशिवाय जर कोणी फिरले तर  त्याचे वाहन देखील जप्त होणार आहे . सदर वाहन लॉकडावुन संपेपर्यंत अथवा साथरोग नियंत्रण कायद्याची अमलबजावणी असेपर्यंत हे वाहन वाहन मालकाला मिळणार नाही . 
        जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी फक्त मेडीकल व दवाखाने आणी दुध विक्री ला परवानगी आहे . मात्र अद्याप किराणा अथवा ईतर कामाच्या निमित्ताने लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत . या सर्वावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यानी हा आदेश काढला आहे याशिवाय आपत्कालीन कायदा ,फौजदारी कायदा आदी कायद्याच्या कलमांतर्गत देखील कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी देधमुख यानी परिपत्रकाद्वारे दिले आहेत .
To Top