सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
ॲड गणेश आळंदीकर
बारामती तालुक्यातील श्री क्षेत्र करंजे येथील ॲड जयवंत मोकाशी यांचे आज (रविवारी )पहाटे अपघाती निधन झाले .
दोन दिवसापुर्वी उंड्री जवळ दुपारी साडेचार वाजणेचे सुमारास माणुसकीची भिंती जवळ चार चाकी पलटी झाल्याने अपघात झाला होता.त्याही परिस्थीतीत त्यानी आपले मित्र एस टी महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड याना फोन करुन अपघाताबद्द्ल माहीती दिली . त्यानंतर ॲड.मोकाशी यांचेवर पुणे येथील रुबी हॉस्पिटल मधे उपचार चालु असताना मेंदुतील रक्तस्त्राव वाढल्याने शस्त्रक्रिये दरम्यान त्यांचा मृत्यु झाला. विश्वकर्मा गृप चे ते सदस्य होते, बंसीलाल आगरवाल चॅरिटेबल ट्रस्ट , व्ही. आय .टी. कॉलेज पुणे येथे ते विधी सल्लागार होते. तसेच पुणे पब्लीक ट्रस्ट असोसिएशन चे ते सभासद होते .
गोरगरीबांचा मित्र हरपला --किरण आळंदीकर
पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थावर विश्वस्त म्हणुन काम करीत असल्याने अनेक विद्यार्थ्याना मोफत प्रवेश मिळवुन देणे ,धर्मादाय संस्थाची कामे नाममात्र दरात करुन देणे यामुळे सर्वांचा ते मित्र बनले होते. त्यामुळे गोरगरीबांचा मित्र हरपला असे मत राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन चे उपाध्यक्ष किरण आळंदीकर यानी व्यक्त केले .करंजे चे राष्ट्रवादी चे अध्यक्ष अनंता मोकाशी यांचे ते बंधु होते . त्यांच्यामागे एक मुलगा एक मुलगी पत्नी व बंधु असा परिवार आहे .
आज दुपारी करंजे येथे मुळ गावी त्यांचेवर अंत्यसंस्कार करणेत येणार आहेत .
COMMENTS