सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती तालुक्यातील निंबुत येथे लोकसहभागातून अजितदादा कोरोना विलीगिकरण कक्षाचे उदघाटन सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व डॉ निरंजन शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
निंबुत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी ३० बेडचा विलीगिकरण कक्ष उभारण्यात आला आहे. कोरोना होऊन गेल्यानंतर काही लोकांना घरी वेगळे राहण्याची सोय नसते. त्यांच्यासाठी याठिकाणी सोय करण्यात आली आहे. चार दिवसापूर्वी सोमेश्वर चे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या पुढाकारातुन वाणेवाडी येथील रामराजे सोसायटीने ५० बेडच कोविड सेंटर उभा केले आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी पक्षाचे जेष्ठ नेते बि जी काकडे होते, यावेळी सोमेश्वर चे उपाध्यक्ष शैलेश रासकर, युवा नेते गौतम काकडे, विजू पाटील, शशिकांत काकडे, धर्यशील काकडे, विजय काकडे, उदय काकडे, राजेंद्र काकडे, डॉ अमोल फरांदे, रणजित फरांदे, अमित काकडे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कारखान्याने अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या वतीने या रुग्णांना नास्ता व जेवण देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सोमेश्वर कारखान्याचे संचालक महेश काकडे यांनी केले.
COMMENTS