सोमेश्वर रिपोर्टर टीम---------
सद्या लॉकडाउन असल्याने उपेक्षित वर्गाला वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या करंजेपुल औटपोस्टच्या वतीने पारधी समाजातील गरजू कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
सोमेश्वरनगर परिसरातील पत्रकारांच्या अहवानाला प्रतिसाद देत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सपोनि सोमनाथ लांडे, सपोउनि योगेश शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सोमेश्वरनगर परिसरातील उपेक्षित पारधी समाजातील कुटुंबांना किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
यावेळी सपोउनि योगेश शेलार, बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश जगताप, पत्रकार युवराज खोमणे, तुषार धुमाळ, पोलीस हवालदार साळुंके, नितीन बोराटे, गौतम लोहकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS