सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंटर व निंबुत येथील अजितदादा विलीगिकरण कक्षाला ऋषी गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने मास्क, अंडी आणि पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
वाणेवाडी येथे सोमेश्वर सहकारी साख़र कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप उपस्थिती होते. तसेच निंबुत येथे सोमेश्वर कारखान्याचे संचालक महेश काकड़े,युवा नेते गौतम काकड़े,माजी उपसरपंच उदय काकड़े आदी मान्यवर उपस्थित होते.
या आयसोलेशन कोवीड सेटर ला कोणत्याही स्वरूपाची वैद्यकीय गरज भासल्यास सोमेश्वर आय सी यु हॉस्पिटल सर्वोतोपरी मदत करेल असे ऋषी गायकवाड यांनी सांगितले.