सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पत्रकार संगीता भापकर यांना जागतिक कृषी पर्यटन २०२१ पुरस्काराचा सन्मान


सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

दैनिक 'सकाळ'च्या मोरगाव (ता. बारामती) येथील बातमीदार संगीता हनुमंतराव भापकर यांना कृषी पर्यटन विकास संस्था व जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार निवड समिती यांच्या वतीने दिला जाणारा 'वर्ल्ड अॅग्री टुरिझम अॅवार्ड-२०२१' नुकताच प्राप्त झाला आहे.
चौदाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त 'कृषी पर्यटनाव्दारे महिला शेतकऱ्यांच्या उद्यमशीलतेचा विकास' हे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. यानुषंगाने जागतिक कृषी पर्यटन निवड समितीने 'वर्ल्ड अॅग्री टुरिझम अॅवार्ड-२०२१' हा पुरस्कार वेगवेगळ्या देशातील कृषी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम  करणाऱ्या अकरा महिलांना जाहिर केला होता. नुकतीच १५ व १६ मे रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळ, पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने दोन दिवस ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. परिषदेत संगीता भापकर यांना ऑनलाईन पध्दतीने सदरचा पुरस्कार जाहीर करून प्रदान करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याच्या पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर, राज्य पर्यटन विकास महांडळाचे संचालक आशुतोष सलील, डॉ. धनंजय सावळकर, कृषी पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक पांडुरंग तावरे आदी उपस्थित होते. आफ्रीका, रवांडा, स्पेन, इडली, फ्रान्स, फिलीपाईन्स अशा विविध देशातील महिलांना यानिमित्त गौरविण्यात आले. भारतातून संगीता भापकर यांच्यासह डॉ. अश्विनी कोळेकर, नंदा कासार, नंदा नरोटे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. 
बारामतीतील तरडोली या जिराईत पट्ट्यात निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र स्थापन करून ग्रामीण व जिराईत भागातील महिलांनासाठी प्रेरणादायक कार्य केले आहे म्हणून भापकर यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे पांडुरंग तावरे यांनी सांगितले.
कृषी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार
बारामतीच्या जिरायत भागात प्रतिकूल परिस्थिती शेती आणि शेतीपुरक व्यवसायाला कृषी पर्यटनाची जोड देत ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि  संवर्धन करण्याचे काम निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र करत आहे.यामुळे ग्रामीण भागातील स्थानिक महिलांना व्यावसायिक दृष्टीकोनातून रोजगार आणि सक्षमीकरणाच्या संधी कृषी पर्यटनामुळे उपलब्ध झाल्या आहेत. या पुरस्काराबद्द्ल भापकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
---

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6982,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पत्रकार संगीता भापकर यांना जागतिक कृषी पर्यटन २०२१ पुरस्काराचा सन्मान
पत्रकार संगीता भापकर यांना जागतिक कृषी पर्यटन २०२१ पुरस्काराचा सन्मान
https://lh3.googleusercontent.com/-SIaZ8pteF4E/YKJOmeTT22I/AAAAAAAAKHQ/fkzTqjtXWew9SnUj1boe8Bd55U0s0jH8wCLcBGAsYHQ/s1600/1621249665670610-0.png
https://lh3.googleusercontent.com/-SIaZ8pteF4E/YKJOmeTT22I/AAAAAAAAKHQ/fkzTqjtXWew9SnUj1boe8Bd55U0s0jH8wCLcBGAsYHQ/s72-c/1621249665670610-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2021/05/blog-post_88.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2021/05/blog-post_88.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy