सोमेश्वरनगर परिसरात कोविड सेंटर करण्याची मागणी : गौतम काकडे यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर न्युज--------

सोमेश्वर पंचक्रोशी (बारामती पश्चिम भागासाठी) कोव्हिड सेंटर उभे करावे अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते गौतम काकडे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 
         याबाबत गौतम काकडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ईमेलद्वारे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
बारामती तालुक्यात कोरोनाचे संकगण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सोमेश्वर पंचक्रोशीत निंबुत, खंडोबाचीवाडी, गडदरवाडी, वाघळवाडी, करंजेपूल, वाणेवाडी, मुरूम, करंजे, शेंडकरवाडी, चौधरवाडी, सोरटेवाडी, होळ, वडगाव, वाकी-चोपडज या गावांमध्ये तसचे इतर वाड्या-वस्त्यांध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला आहे. एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्यास बारामती, माळेगाव अथवा लोणंद याठिकाणी खाजगी तसेच सरकारी कोव्हिड सेंटरमध्ये नेऊन सुद्धा रूग्णांना लवकर बेड उपलब्ध होत नसल्याने रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची धावपळ होत आहे व मनस्तापास सामोरे जावे लागतआहे.
      त्या संदर्भात सोमेश्वरच्या पश्चिम भागातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना भेटून वारंवार चर्चा करूनही त्यांच्याकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे लोकांमध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. तरी दादा आपणास आम्ही नम्र विनंती करतो की आपल्या सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची नविन बांधकाम
झालेली वसतीगृहाची इमारत कोव्हिड सेंटर बनविण्याच्या दृष्टीने योग्य आहे व तेथेच कोव्हिड सेंटर व्हावे अशी आपल्या पक्षातील व इतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. तरी दादा आपण संबंधीत
पदाधिकारी व अधिकारी यांना योग्य त्या सुचना देऊन हे कोव्हिड सेंटर लवकरात लवकर सुरू करणेबाबत आदेश व्हावेत असे निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजवर्धन शिंदे, पुणे जिल्हा आगर नियंत्रक रमाकांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुका युवकचे मा. अध्यक्ष विक्रम भोसले, सोमेश्वर चे संचालक लक्ष्मण गोफने, उद्योजक संग्राम सोरटे यांनी याबाबत निवेदनावर सह्या केल्या आहेत.
To Top