सोमेश्वर रिपोर्टर न्युज----
बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि वाणेवाडी येथील रामराजे सोसायटी हे १५० बेडच कोविड सेंटर उभे करणार असल्याची माहिती सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
यावेळी अध्यक्ष जगताप सोमेश्वर रिपोर्टर शी बोलताना म्हणाले, आपला सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामार्फत सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ येथील मुलीच्या वसतिगृहात १०० बेडच कोविड सेंटर सुरू होणार आहे. या वसतिगृहातील किरकोळ विद्युत जोडणी, तसेच सांडपाणी व्यवस्थापण ची कामे पुढील आठवड्यात पूर्ण होणार असून आरोग्य विभागाच्या मदतीने पुढील आठवड्यात या ठिकाणी १०० बेडच कोविड सेंटर सुरू होणार आहे. तसेच वाणेवाडी येथील रामराजे सोसायटीच्या वतीने रामराजे जगताप स्मृती भवन या ठिकाणी ५० बेडच कोविड सेंटर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हे कोविड सेंटर
उभे राहणार असल्याचे अध्यक्ष जगताप यांनी सांगितले.
तालुक्यातील विविध संस्था तसेच सामाजिक संस्थांनी कोविड सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला असून आता सोमेश्वर कारखाना व रामराजे सोसायटीने कोविड सेंटर उभे करण्यासाठी आता पुढाकार घेतला आहे. रामराजे सोसायटीने गेल्या पंधरा दिवसापुर्वी रामराजे सोसायटीत कोविड सेंटर सुरू करण्याबाबत बारामतीचे प्रांताधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार केला असून येणाऱ्या सोमवारी अथवा मंगळवारी हे कोविड सेंटर उभे राहत आहे.
बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील सोमेश्वरनगर परिसरातील जवळपास २५ ते ३० गावातील नागरिकांना याचा लाभ होणार आहे. गेल्या आठवड्यात सोमेश्वर विद्यालय या ठिकाणी rtpcr ची सोय केल्याने बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील नागरिकांना आता बारामती या ठिकाणी तपासणी साठी जावे लागत नाही.