राजकारणात अडकले सोमेश्वरचे कोविड सेंटर, ढीगभर पुढारी पण बीनकामाचे : एका पुढाऱ्याचे वाशिल्यावर संपूर्ण कुटुंबाचे लसीकरण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर न्यूज------

पश्चिम भागातील सोमेश्वरनगर परीसरात कोव्हिड सेंटर अतिशय गरज आहे. मात्र येथील जनतेला सध्या बारामती आणि माळेगाव येथील सेंटरवर अवलंबून रहावे लागत आहे. गेल्या वर्षापासून याठिकाणी कोव्हिड सेंटरची मागणी होत आहे मात्र पदाधिकाऱ्यांच्या राजकारणामुळे ते झाले नाही. याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून अनेक कुटुंबातील प्रमुख सदस्य जीव गमावत आहेत. अडचणीच्या वेळी सर्वांना मदत करण्याची गरज असताना ती होताना दिसत नाही. निवडणुकांमध्ये जनतेचे उंबरे झिजवणाऱ्या पुढाऱ्यांना जनतेनेही खड्यासारखे बाजूला करण्याची वेळ आली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच याठिकाणी कोव्हिड सेंटर उभारण्यासाठी सूचना द्याव्यात अशी मागणी या परीसरातील बहुतांश ग्रामस्थ आणि युवकांनी केली आहे.

एका प्रमुख पुढाऱ्यांनी केले संपूर्ण कुटुंबाचे लसीकरण....
एकीकडे  ४५ वरील ग्रामस्थांना लसीचा अद्याप एकही डोस मिळाला नाही मात्र सोमेश्वरनगर परिसरातील  राष्ट्रवादीच्या  प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या कुटूंबातील १८ वर्षांवरील सदस्यांना वशिला आणि दमबाजी करून  लसीकरण करून घेतले असल्याचे समजत आहे. प्रचंड उन्हात ज्येष्ठ नागरिक लसीकरण करण्यासाठी उभे राहत आहेत मात्र त्यांना लसीकरण न करता तोंडे बघून लस दिली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांना कोणीही वाली उरला नाही.
To Top