बारामती शहर आणि ग्रामीण भागात आजपासून सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन : आज रात्री १२ पासून अंमलबजावणी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर न्युज-------

 सातत्याने वाढत्या रुग्णसंख्येला आवर घालण्यासाठी बारामती संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. आज प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आज मंगळवार (ता.५) पासून हा लॉकडाऊन होणार असून सात दिवस तो राहणार आहे. सात दिवसात कोरोनाची रुग्ण संख्या आटोक्यात आली नाही, तर पुन्हा सात दिवस लॉकडाऊन वाढवला जाणार आहे.
        बारामती मध्ये दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने हे रुग्ण संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली होती. त्यानुसार काल तातडीची बैठक बारामतीच्या प्रशासकीय भवनात तहसीलदार विजय पाटील यांच्या कार्यालयात पार पडली.
          प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे यांच्यासह बारामती शहर व तालुक्यातील सर्व प्रशासकीय विभागांचे अधिकारी, नगरपरिषदेचे पदाधिकारी, शहरातील व्यापारी, तालुक्यातील व्यापारी प्रतिनिधी उपस्थित होते.
           या बैठकीतील चर्चेत बारामती व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील भाग घेतला. यादरम्यान वेगळ्या सूचना मांडण्यात आल्या. बारामतीतील रुग्ण संख्या कमी करण्यासाठी सर्वांचे एकमत आहे, मात्र काही दुकाने चालू आणि काही दुकाने बंद अशी भूमिका नको अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
       बारामतीमध्ये केवळ या एप्रिल महिन्यात गेल्या संपूर्ण वर्षभरात जेवढे रुग्ण आढळले, तेवढे रुग्ण एका महिन्यात आढळले आहेत. या एकाच महिन्यात नऊ हजार रुग्ण आढळल्याने ही चिंता वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर रुग्णांच्या संख्येचा हा विस्फोट लक्षात घेता बारामतीमध्ये कठोर लॉकडाऊनची गरज होती.
To Top