सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे रामराजे जगताप स्मृतीभवनामधे सोमेश्वर कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या पुढाकाराने ५० बेडचे अजितदादा कोविड सेंटर चालू करण्यात आले आहे.
लोकसहभागातुन हे कोविड केअर चालत असुन येथील सोमेश्वर पत्रकार गृप चे दत्ता माळशिकारे ,ॲड गणेश आळंदीकर, संतोष शेंडकर, महेश जगताप,
या कोविड केअर सेंटर ला कै रामराजे जगताप वि का सोसायटी तर्फे हॉल व ईतर व्यवस्था उपलब्ध करुन दिली असुन येथे पाच च्या आत स्कोअर असलेल्या रुग्णाना ॲडमिट केले जाते प्रसंगी रुग्णाना ऑक्सीजन ची देखील व्यवस्था केली आहे जर रुग्ण अत्यवस्थ झाला तर बारामती मधे त्याना बेड मिळवुन दिला जातो . सर्व रितसर परवानग्या घेवुन शासकीय डॉक्टर व पारिचारीका येथे रुग्णांची देखभाल घेत आहेत . त्याचप्रमाणे या सोसायटी मार्फत निंबुत येथे महेश काकडे व सहकारी वर्गाने चालु केलेल्या विलगीकरण कक्षाला जेवणाचा पुरवठा केला जातो . जास्तीत जास्त लोकानी लोकसहभागातुन दोन तीन गावात मिळुन एक असे कोविड केअर सेंटर उभे करावे म्हणजे रुग्णाची गैरसोय होणार नाही असे यावेळी पुरुषोत्तम जगताप म्हणाले . लवकरच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यामार्फत देखील सोमेश्वर विद्यालयात मुलींच्या वसतीगृह मधे १०० बेड चे कोविड केअर सेंटर उभारले जाणार आहे . कोरोनाचे वाढते संभाव्य धोके नवीन लाटा यावर एकजुटीने एकत्र येवुन विविध संस्था व उद्योजकानी सामाजीक बांधीलकीतुन असे कोव्हीड केअर अथवा विलगीकरण कक्ष उभारावेत असेही ते म्हणाले. यावेळी रामराजे सोसायटीचे सचिव किरण जगताप, सहसचिव प्रदीप जगताप, सहाय्यक वसंत मांढरे, कर्मचारी शिवाजी कोळेकर, राजाभाऊ आदी मान्यवर उपस्थित होते