लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त वाणेवाडी कोविड सेंटरला वाफेची मशीन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----

वाणेवाडी ता बारामती येथील अजितदादा कोविड सेंटरला २५ वाफेची मशीन देण्यात आल्या. उत्कर्ष आश्रम शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक सुनिल पाटील व शिक्षिका पूजा पाटील यांच्या  लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्त या वाफेच्या मशीन देण्यात आल्या. 
        सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचेकडे या मशीन सुपूर्त करण्यात आल्या. यावेळी समर्थ ज्ञानपीठ चे अध्यक्ष अजिंक्य सावंत, राष्ट्रवादी चे शिक्षक सेलचे शहर अध्यक्ष अविनाश सावंत, तंटामुक्ती अध्यक्ष महादेव सावंत, सोसायटीचे संचालक अनिल शिंदे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत गायकवाड, रमेश गायकवाड, पोपट जाधव, राहुल सावंत, अक्षय शिंगाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
To Top