सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
ठरवले तर आपण काय करू शकतो हे बारामती तालुक्यातील 'समाजसेवा' या व्हाट्सअप ग्रुपने दाखवून दिले आहे. ग्रुपच्या सदस्यांनी दोन दिवसात तब्बल सव्वा लाखाचा निधी गोळा केला आहे.
बारामती व पुरंदर तालुक्यातील एकुण नऊ कोविड सेंटरला वाटप केला. यामध्ये पुरंदर तालुक्यातील माळशिरस ११ हजार, नायगाव ५ हजार, खळद ११ हजार, नीरा ११ हजार, वीर ११ हजार तर बारामती तालुक्यातील वाणेवाडी २१ हजार, मोरगाव ५ हजार, सुपे १५ हजार, निंबुत ११ हजार असा निधी वाटप करण्यात आला.
आज या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. वाणेवाडी येथील अजितदादा कोविड सेंयरला २१ हजाराचा धनादेश सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांचेकडे हा धनादेश सुपूर्त करण्यात आला. यावेळी समाजसेवा व्हाट्सएप ग्रुप अडमीन मदन काकडे, समन्वय योगेश सोलस्कर, जेष्ठ सदस्य राजू बनसोडे,गौतम काकडे, टी के जगताप, पत्रकार संतोष शेंडकर, डॉ सौरभ काकडे, शशिकांत जेधे, राजेंद्र धुमाळ, धर्यशील काकडे, संग्राम जगताप, डॉ राहुल खरात, प्रसाद सोनवणे, हेमंत गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर परिसरातील सोशल मीडियावर समाजसेवा ग्रुप हा तालुक्यातच काय पण आता जिल्ह्यात गाजू लागला आहे. सामाजिक बांधिलकी जपत व्हाट्सअप वरील या ग्रुपने कोविड रुग्णांसाठी तब्बल सव्वा लाख रुपयांचा निधी गोळा केला आहे. सोशल मीडियावरील कोविड रुग्णांसाठी सव्वा लाख रुपयांचा निधी गोळा करणारा समाजसेवा ग्रुप हा पूणे जिल्ह्यातील एकमेव ग्रुप ठरला आहे.
बारामती तालुक्यातील निंबुत येथील शेतकरी कृती समितीचे जिल्हा सरचिटणीस मदन काकडे यांनी ८ सप्टेंबर २०१४ रोजी बारामती तालुक्यात बारामती, पुरंदर, फलटण व खंडाळा भागातील लोकांना एकत्र घेत व्हाट्सअप च्या सोशल मीडियावर समाजसेवा नावाने ग्रुप सुरू केला.
या ग्रुप मध्ये सर्वच क्षेत्रातील लोक आहेत. या ग्रुप मध्ये विविध सामाजिक विषयावर नियमित चर्चा झडत असतात. या ग्रुपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन महिने प्रतीक्षा करावी लागते. सद्या राज्यात कोविड चे रुग्ण वाढत चालल्याने आपणदेखील फुल नाही फुलाची पाकळी द्यावी या उद्देशाने ग्रुपचे सदस्य तसेच जेष्ठ पत्रकार दत्ता माळशिकारे यांनी ही कल्पना मांडली. ग्रुप अडमीन मदन काकडे यांनी ग्रुपवर याबाबत आवाहन केले. आणि आश्चर्यम.... दोनच दिवसात कोणी दोनशे, कोणी पाचशे तर कोणी हजार रुपये जमा करत तब्बल सव्वा लाख रुपये जमा केले.