सोमेश्वर रिपोर्टर टीम----
बारामती तालुक्यातील वाकी मगरवाडी रोडवर बिबट्याचे बिबट्या दिसला असल्याने परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलीस पाटील हनुमंत पाटील तसेच वनविभागाकडून करण्यात आले आहे.
काल सायंकाळी वनविभाग कर्मचारी तसेच वाकी गावातील शशिकांत जगताप यांना बिबट्याचे दर्शन झाले आहे.
याबाबत वाकी गावाच्या शीवेवर बिबट्या दिसल्याचा संदेश ग्राम सुरक्षा यंत्रनेच्या फोनवरुन रात्री १० वाजता देण्यात आला. सर्वांनी जास्त करुन रात्री दारी धरण्यासाठी जाणारया लोकांनी कालजी घ्या. असे आवाहन करण्यात आले. दरम्याम वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक सपोनि योगेश शेलार तसेच वनरक्षक कोकाटे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.